Timb (टिंब)

शोध आणि बोध - प्राचीन शेती तंत्र विज्ञानाचा

शोध आणि बोध – प्राचीन शेती तंत्र विज्ञानाचा

कृषिपराशर, वृक्षायुर्वेद, उपवनविनोद अशा अनेक बहुमोल ग्रंथांचा धांडोळा घेऊन शेतीविषयक तंत्र आणि विज्ञानाचा शोध, वाचन, अभ्यास, प्रयोग या चतुःसूत्रीच्या निकषांवर आधुनिक दृष्टिकोनातून वेध घेणारा ग्रंथ. 

 लेखक: रविंद्र अनंत साठे

माझ्या मते माहितीची उपलब्धता हा समाजप्रबोधनाचा महत्वाचा घटक आहे, प्राचीन शेतीविषयक समाजजाणीव, सुसंगत,तपशीलवार माहिती समाजातील जिज्ञासू, विद्यार्थी, शिक्षक,संशोधक व अगदी सर्वसामान्य शेतकरी बंधूंना ह्या पुस्तकाद्वारे अत्यंत उपयोगी ठरणार आहे. प्राचीन शेतीविषयी इतकी सुसंगत, नावीन्यपूर्ण माहिती देणारे मराठी पुस्तक माझ्या तरी वाचनात आलेले नाही. त्यामुळे मराठी वैज्ञानिक साहित्यात ह्या पुस्तकाद्वारे मोलाची भर पडलेली आहे, असे मला खात्रीने वाटते. –  पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद प्र. मोघे

ारतीय नौका नयनाचा इतिहास

‘भारतीय नौका नयनाचा इतिहास’ – डॉ. द. रा. केतकर

डॉ. केतकरांनी ‘भारतीय नौका नयनाचा इतिहास’ प्राचीन काळ, मराठा आरमार (मध्ययुगीन कालखंड) आणि ब्रिटिश साम्राज्य काळ (म्हणजेच पेशवाई अस्ताला गेल्यानंतर साधारणपणे १८१८ ते १९४७ स्वातंत्र्य मिळेपर्यंत ) अशा तीन भागात मांडला आहे. सिंदिया स्टीम आणि इतर कंपन्यांसंबंधी विस्तृत माहिती वाचकाला तिसऱ्या भागात मिळते. 

भारतीय नौकानयनाचा स्वातंत्र्यप्राप्ती पर्यंतचा समग्र इतिहास या एका ग्रंथात अभ्यासकाला मिळतो. त्यामुळे संदर्भ ग्रंथ म्हणून याचे मोल जास्त आहे.

अरुण भंडारे 

रामाच्या पदचिन्हांवरून पुष्पक विमानाने पंख पसरले

कालिदासाच्या मेघदूताचा हवाईमार्ग तपासणारे वैमानिक डॉ.भावे

रामाच्या पदचिन्हांवरून – मकरंद करंदीकर

पुण्यामधील डॉ.भावे हे अत्यंत निष्णात शल्यचिकित्सक !  मेघदूत आणि रघुवंश ही महाकाव्यांचा पूर्ण रसास्वाद घेण्यासाठी डॉ. भावे यांनी संस्कृतमध्येही पारंगत्व मिळविले. रघुवंशातील रामाच्या पदयात्रेच्या मार्ग प्रत्यक्ष शोधण्यासाठी जैन रामायणापासून ते बाली बेटातील रामायणापर्यंत वेगवेगळ्या १५० प्रकारच्या रामायणांचा शोध घेतला. 

कालिदासाने मेघदूतामध्ये वर्णन केलेल्या, नागपूरपासून हिमालयापर्यंतच्या हवाईमार्गाचे ( Navigation Log ) डॉ. भावे यांनी आपल्या विमानातून प्रत्यक्ष निरीक्षण करून त्याचे संपूर्ण छायाचित्रण केले. ज्यावेळी आकाशात उडण्याची कला नव्हती किंवा विमाने अस्तित्वात आली नव्हती असे जग मानते ( आपल्या पुराणकालात अद्ययावत विमानविद्या अस्तित्वात होती ) तेव्हा कालिदासाने हे संपूर्ण अवकाशवर्णन इतके अचूकपणे कसे केले असेल ? कालिदासाच्या त्या वर्णनाची अचूकता पाहून त्यांनी कालिदास हा उत्तम वैमानिक असला पाहिजे हे सिद्ध केले. या त्यांच्या कार्यासाठी उज्जैनच्या कालिदास अकादमीने त्यांचा मोठा सन्मान केला.

महाकवी कालिदास दिवसानिमित्त खास!

प्रतीक्षा शिवाची

‘प्रतीक्षा शिवाची – काशी– ज्ञानवापीच्या सत्याचा शोध’ – विक्रम संपत

या पुस्तकाच्या माध्यमातून विश्वेश्वर किंवा विश्वनाथाच्या रुपातील शिवाचा अधिवास असणाऱ्या काशीचा इतिहास, तिची प्राचीनता आणि पावित्र्याचे दर्शन घडते. जो या शहरात आपला देह ठेवतो त्याला मोक्ष मिळेल असे वचन प्रत्यक्ष शिव देतो. हे पुस्तक या स्वयंभू ज्योतिर्लिंग विश्वेश्वराच्या इतिहासाचा सखोल शोध घेते. आपल्या भक्तांचे आश्रयस्थान असलेले हे विश्वेश्वर मंदिर हे नेहमीच धर्मांध मूर्तीभंजकांच्या निशाण्यावर राहिलेले आहे. परंतु जेव्हा जेव्हा हे मंदिर उद्ध्वस्त करून त्याचे अस्तित्व पुसून टाकण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा हे मंदिर पुन्हा उभे राहिले आणि भरभराटीला आले. 

Shopping cart close