Timb (टिंब)

The Golden Road: How Ancient India Transformed the World

भारताचा सुवर्ण काळ – निळु दामले

The Golden Road: How Ancient India Transformed the World -William Dalrymple (Bloomsbury)

भारताचा इतिहास अनेक इतिहासकार आणि संशोधकानी मांडला आहे. भारतात एकेकाळी वैभव होते हे बहुतेक सर्वानी मान्य केलं आहे. विल्यम डॅलरिंपल तेच या पुस्तकात मांडतात, पण आजवर ठळकपणे न मांडले गेलेले काही पुरावे ते या पुस्तकात वाचकांसमोर ठेवतात.उदा. रोममधे सापडलेले लेखी पुरावे. डॅलरिंपल यांची शैली रंजक आहे हे, नाट्यमय आहे. पण नाट्यमयतेच्या नादी लागून पुराव्यांपासून ते दूर जात नाहीत. थोडक्यात म्हणजे ते कादंबरी किवा नाटक लिहीत नाहीत, इतिहासच लिहितात.

How to Stand Up to a Dictator: The Fight for Our Future

प्राण पणाने लढणारी पत्रकार -निळू दामले

How to Stand Up to a Dictator: The Fight for Our Future – Maria Ressa (Author)

प्रस्तुत  पुस्तकाच्या पहिल्या तीन धड्यांत लेखिकेनं जन्मापासून पत्रकारीची सुरवात करेपर्यंतची हकीकत मांडली आहे. चौथ्या धड्यापासून त्यांनी केलेली पत्रकारी कामगिरी सुरू होते. तेही एका परीनं लेखिकेचं आत्मकथनच आहे. पुस्तकात सर्वात शेवटी लोकशाही वाचवणं, हुकूमशाहीशी सामना करणं हा जाहिरनामा आहे.

हुकूमशाहीशी सामना करायचा किंवा लोकशाही वाचवायची यासाठी काय करावं हे लेखिकेनं केलेली कामगिरी सांगतं,ते स्वतंत्रपणे सांगण्याची आवश्यकता नाही.

Shopping cart close