चिंता विकाराचा प्रसार । The Anxious Generation – Jonathan Haidt -निळू दामले
The Anxious Generation: How the Great Rewiring of Childhood Is Causing an Epidemic of Mental Illness – Jonathan Haidt
आपलं कसं होणार याची चिंता माणसाला असते. सभोवतालची परिस्थिती इतकी अनुपकारक असते की आपल्याला अपयश येणार, धडक बसणार असं माणसाला पदोपदी वाटत असतं. आपण कमी पडतो असंही माणसाला वाटतं. असं सतत वाटत असण्यातून नैराश्य येतं.
या विकारानं ग्रासलेल्या माणसाची कार्यक्षमता कमी होते, माणसं कामातून जातात, ढिली होतात, ढिम्म होतात. आत्महत्याही करतात.
प्रस्तुत पुस्तक विचार करायला लावतं, आपल्याला चिंताग्रस्त करतं.