पुस्तकं पाच हजार वर्षं टिकली की! – Nilu damle
Bibliophobia: The End and the Beginning of the Book – Brian Cummings.
पुस्तकांची भीती/तिरस्कार हा प्रस्तुत पुस्तकाचा विषय आहे. माणूस पुस्तकांचा तिरस्कार करतो आणि पुस्तकावर प्रेमही करतो हे सांगता सांगता लेखक पुस्तक निर्मितीचा दीर्घ इतिहास या पुस्तकात चितारतो.
पुस्तक ही एक वस्तू असते तसंच ती एक कल्पनाही आहे असा लेखकाचा सिद्धांत आहे.
पुस्तक जाळा, पुरा, नदीत बुडवा, काहीही करा.
पुस्तक टिकतं.
अभंग नदीत बुडवले. तरीही टिकले.