Timb (टिंब)

भाऊ पाध्ये (Bhau Padhye)

भाऊंची ओळख

भाऊ पाध्ये यांचं पूर्ण नाव प्रभाकर नारायण पाध्ये. त्यांचा जन्म दादर येथे २९ नोव्हेंबर १९२६ रोजी झाला. मुंबई विद्यापीठातून १९४८ साली त्यांनी अर्थशास्त्र घेऊन पदवी मिळवली. १९४९ ते ५१ या काळात ते कामगार संघटनेचे पूर्ण वेळ कार्यकर्ते होते. नंतर किंग जॉर्ज हायस्कूल (दादर), एल कदूरी हायस्कूल (माझगाव) आणि बी. एस. इझिकेल हायस्कूल (सँडहर्स्ट रोड), येथे प्रत्येकी एक वर्ष शिक्षकाची नोकरी केली. पुढे स्प्रिंग मिल (वडाळा) येथे ४ वर्षं आणि आयुर्विमा महामंडळ येथे ४ महिने कारकुनी केली. १९५६ साली शोशन्ना माझगावकर या कामगार संघटनेच्या कार्यकर्तीशी लग्न. ‘हिंद मझदूर’, ‘नवाकाळ’ (१ वर्ष), ‘नवशक्ति’ (११ वर्षं) या नियतकालिकांतून पत्रकारिता. ‘नवशक्ती’ सोडल्यावर काही काळ ‘झूम’ या सिने-साप्ताहिकाचे संपादन. ‘रहस्यरंजन’, ‘अभिरुची’, ‘माणूस’, ‘सोबत’, ‘दिनांक’, ‘क्रीडांगण’, ‘चंद्रयुग’ या नियतकालिकांतून स्तंभलेखन. १९८९पासून अर्धांगाच्या आघाताने लेखन अशक्य झालं.

मृत्यू- ३० ऑक्टोबर १९९६

भवानराव पंतप्रतिनिधी

औंधाचे भवानराव पंतप्रतिनिधीं

ही गोष्ट आहे एका राजाची. राजेपण कधीच न मिरवलेल्या सच्च्या गांधीवादी माणसाची. राजा असला तरी तो प्रजेमध्ये मिसळून गेलेला असा माणूस महाराष्ट्रात होऊन गेला हे आता कदाचित पटणार नाही.

औंधच्या भवानराव पंतप्रतिनिधींनी संस्थानात लोकशाही कशी आणली, हे ही जाणुन घेऊ! 

ओंकार करंबेळकर, बीबीसी मराठी प्रतिनिधी

15 सप्टेंबर 2020 / 26 नोव्हेंबर 2021

नरहर कुरुंदकर कोण होते आणि त्यांचे विचार आजही लागू होतात का?

नरहर कुरुंदकर (१५ जुलै, इ.स. १९३२ – १० फेब्रुवारी, इ.स. १९८२) हे मराठी भाषा व साहित्याचे समीक्षक, आणि समाजचिंतक होते. ते एक प्रभावी वक्ते होते. कुरुंदकर यांचा जन्म १५ जुलै १९३२ रोजी महाराष्ट्रातील मराठवाडा भागातील नांदापूर (जि. हिंगोली ) गावात झाला. हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा हे त्यांचे मूळ गाव.

त्यांनी प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालय, नांदेड‎ येथे शिक्षक म्हणून तर नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पीपल्स कॉलेज, नांदेड येथे प्राचार्यपद भूषविले होते.विशेष बाब म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दोनदा बिनविरोध त्यांच्याकडे येऊनही त्यांनी त्याला नम्रपणे नकार दिला होता.

नरहर कुरुंदकर म्हटलं की, त्यांनी लिहिलेली साहित्य संपदा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. जागर, रूपवेध, मनुस्मृती, शिवरात्र, अभयारण्य, वाटा तुझ्या माझ्या ही पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.

आपल्याला असलेले प्रश्न संविधानाच्याच चौकटीत सोडावावेत असा त्यांचा आग्रह होता. ही गोष्ट आजच्या काळातही तितकीच लागू होते.– तुषार कुलकर्णी ( बीबीसी मराठी)

15 जुलै 2020

पुनर्लेखन  15 जुलै 2023

एल.एम.कडू यांची मुलाखत – बाल साहित्य अकादमी पुरस्कार मराठी (२०१७)

श्यामलाचे जग हा ब्लॉग आहे जो बाल लेखक, मुक्त हस्त लेखिका आणि  Kahani Takbak मुख्य विचारवंताने लिहिलेला आहे. या ब्लॉगमध्ये भारतीय बालसाहित्य जगतातील घडामोडी आणि व्यक्ती विषयावर आहे.

एल.एम.कडू यांची मुलाखत – बाल साहित्य अकादमी पुरस्कार मराठी (२०१७) – 18 जुलै 2017

मराठी साहित्यासाठी (2017) बाल साहित्य पुरस्काराने सन्मानित, लक्ष्मण महिपती कडू (एल.एम. कडू) हे शेतकरी, चित्रकार आणि लेखक आहेत. राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेले खारीचा वाटा या त्यांच्या पुस्तकासाठी त्यांना  राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

बालसाहित्याची चर्चा आणि चिंतन

बालसाहित्याविषयीचा विचार हा ग्रंथव्यवहारालाही चालना देत असतो. ‘येत्या वर्षभरात आजूबाजूच्या मुलांना मी दहा पुस्तकांची ओळख करून देईन आणि त्यांच्याकडून ती वाचून घेईन’ हा निश्चय प्रत्येकानं केला तर आगामी काळात मुलांच्या संदर्भातलं ग्रंथव्यवहाराचं चित्र पुष्कळच बदललेलं असेल.
– विद्या सुर्वे-बोरसे

बालसाहित्य प्रगल्भ व्हावे

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुढाकाराने विदर्भ साहित्य संघ बालसाहित्यावर एक दिवसाचे राज्यस्तरीय चर्चासत्र आज बुलढाणा येथे आयोजित करीत आहे. त्या निमित्ताने मुलांच्या वाचनसंस्कृतीचा लेखाजोखा…

– नरेंद्र लांजेवार

बालसाहित्य कशासाठी?

‘जादूची चटई’ ते ‘जादूई दिवा’कालीन मराठी बालसाहित्य छापले जाणे जागतिकीकरणाच्या आरंभीच बंद झाले. भा. रा. भागवतांपासून ते बालसाहित्यात आवडीने वाचले जाणारे सारेच लेखक नव्या युगाच्या उंबरठय़ावर रद्दबातल ठरले, ते पालकांनी आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत घालण्याची असोशी कायम राखल्यामुळे. पण शिक्षणासाठी इंग्रजी माध्यम स्वीकारले म्हणून मातृभाषेकडे पूर्ण पाठ फिरवण्याची गरज नाही, हे स्पष्ट करणारे नवे लेखक आणि चित्रकार सध्या देशभरात प्रादेशिक बालसाहित्याची निर्मिती करीत आहेत. इंग्रजी उत्तम राखून आपल्या पाल्याला मातृभाषेचीही गोडी लागण्यासाठी या बालग्रंथ प्रयोगांचे आजच्या काळातील महत्त्व पालकांनी जाणून घेण्याची मात्र गरज आहे. शाळांना लागणाऱ्या उन्हाळी सुट्टय़ांच्या निमित्ताने ताज्या मराठी बालसाहित्याची हालहवाल घेण्याचा हा प्रपंच.

– माधुरी पुरंदरे

गोष्टीवेल्हाळ! – द. मा. मिरासदार

कथा हा साहित्यप्रकार अतिशय तरलपणे हाताळणाऱ्या त्या काळातील नवकथेहून निराळा बाज घेऊन दमा साहित्यविश्वात अवतरले. त्यांच्या चित्रमय शैलीने वाचणारा नुसता गालातल्या गालात स्मित करीत नाही, तर खळखळून हसतो. जणू काही ती घटना आपल्या समोरच घडते आहे, असा सुखद भास व्हावा, अशी त्यांची कथा. वाचनाएवढेच त्यांच्या कथा त्यांच्या मुखातून ऐकणे अधिक बहर आणणारे. उत्तम वक्ता असणे वेगळे आणि कथा रंगवून सांगणे वेगळे. मिरासदारांकडे हे दोन्ही गुण होते. त्यांची कथा ऐकणे म्हणजे शब्दांतून रंगणारा चित्रपट. त्यातील पात्रे, त्यांचे संवाद, घटना, त्यातील फजिती, त्याने येणारे कसनुसेपण हे सारे त्यांच्या कथाकथनात अशा बाजाने येत असे, की श्रोता हसून हसून दमून जाई. मिरासदार, पाटील आणि माडगूळकर या लेखकत्रयीने महाराष्ट्राला त्याची खरीखुरी ओळख करून दिली. शहरी लेखकांच्या कथा वाचणाऱ्या वाचकांनाही मिरासदारांनी अतिशय अलगदपणे आपल्या तंबूत आणून ठेवले. केवळ विनोद एवढय़ाच भांडवलावर ते शक्य नव्हतेच. माणसे वाचत असताना, त्यांच्या भोवतालचा परिसर, त्यांच्या लकबी, त्यांच्यातील पापभीरूपणा, टागरटपणा, इरसालपणा, बेरकीपणा, वाह्य़ातपणा, सौजन्य आणि औद्धत्य या सगळ्या गुणांचा दमा आपल्या कथांमधून सहजपणे परिचय करून देतात. त्यामुळे त्या कथांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.

..लाख बिठा दो पहरे!

२३ एप्रिल हा आंतरराष्ट्रीय पुस्तक दिन आणि आंतरराष्ट्रीय कॉपीराइट दिन. कॉपीराइट पुस्तक वाचण्याच्या आड येऊ लागला तर काय होईल, या प्रश्नाचा वेध घेणाऱ्या एका वाचनवेडय़ा वकिलाने एका मराठी पुस्तकाच्या कॉपीराइट संदर्भात दिलेला न्यायालयीन लढा आणि घडवलेला इतिहास यांची आगळीवेगळी कहाणी..

Shopping cart close