• -100%

    छत्रपती शिवाजी महाराज – डॉ.प्र.न.देशपांडे

    0

    निवेदन

    लोकोत्तर व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो कधीही पुरेसा आणि समाधानकारक असत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे अशा व्यक्तींपैकी एक होते.

    शिवाजी महाराजांचे जीवन, त्यांनी घडविलेला इतिहास हा केवळ मराठी भाषा असलेल्या अभ्यासकांचा-सृजनशील लेखकांच्या लेखनाचा विषय झालेला नाही तर इतर भारतीय भाषांतील अभ्यासकांच्या, लेखकांच्या लेखनाचा विषय झालेला आहे.

    अशा या लोकोत्तर पुरुषाच्या जीवनाचा व त्यांनी घडविलेल्या इतिहासाचा मोजक्या पण नेमक्या  शब्दांत परिचय व्हावा म्हणून श्रीशिवाजी महाराजांवर एक छोटेखानी चरित्रग्रंथ लिहून देण्याची विनंती महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने डॉ. प्र. न. देशपांडे यांना केली. “शिवाजी महाराजांनी शासनात शिस्तबद्धता निर्माण केली; न्यायदानात निःस्पृहता दर्शविली; गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱयांना मुलाहिजा न ठेवता समज दिली; पश्चात्तापदग्ध होऊन परतलेल्या वतनदारांना अभयदान दिले; सर्व धर्माना समान लेखले; साधुसंतांचा यथोचित आदर केला; परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आढळते, ती म्हणजे रयतेची काळजी. रयतेला लेकरांप्रमाणे मानणारा हा राजा केवळ महान युगपुरुष नव्हता तर मानवतेचे उत्कट तत्त्वज्ञान सांगणाऱ्या व आचरणाऱया महात्म्याप्रमाणे तो वंदनीय थोर पुरुष होता.” हा या चरित्रग्रंथाचा डॉ. प्र. न. देशपांडे यांनी केलेला समारोप वाचल्यानंतर त्यांनी आमची विनंती सन्मानित केल्याचे स्पष्ट होते. डॉ. प्र. न. देशपांडे यांचे आम्ही आभारी आहोत.

    – रा. रं. बोराडे

    मुंबई अध्यक्ष

    दि. १६ जुलै, २००२ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई

    Digital Book

    Original price was: ₹45.00.Current price is: ₹0.00.
    Add to cart
  • -100% महाराष्ट्र महोदयाचा पूर्वरंग

    महाराष्ट्र महोदयाचा पूर्वरंग

    0

    महाराष्ट्रमहोदयाचा पूर्वरंग  

    श्री ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेला मराठी भाषेचा पोशाख चढवून स्वतःबरोबरच भाविक प्राकृत जनांस अमृतानुभवाची वाट दाखवून समाधि घेतल्यावर लवकरच महाराष्ट्रसाम्राज्य लयास गेलें. परंतु बाह्यतः जरी हा मोठा फरक झाली तरी ज्ञानेश्वरांनी महाराष्ट्रीयांच्या विचारस्वातंत्र्यास जें शुद्ध, सात्त्विक आणि ठळक वळण लावून दिलें तें कायमच झालें. ज्ञानेश्वरांचा समकालीन परंतु त्यांच्या मागें अर्धशतकावर जगलेला असा जो नामदेव, त्याला परधर्मी राजाचा काच सोसावा लागलाच. तात्पर्य काय, नामदेवापासून तों तहत तुकाराम-रामदासांपर्यंत अडीच-तीनशें वर्षांत पुढें होणाऱ्या यच्चयावत्‌ साधुसंतांस व त्यांच्या अनुयायांस आणि त्यांच्या समकालीन सर्व स्वधर्मनिष्ठ मराठ्यांस परधर्मी राजांचा आणि राजपुरुषांचा छळ सोसावा लागला. त्या सर्वांनी तो आपापल्यापरी ईश्वरावर श्रद्धा ठेवून सोसलाही; परंतु आपणांस हा सोसावा लागत असणारा जाच अन्नाय्य आहे; हे परकी लोक आपल्या देशांत केवळ शिरजोरपणाने घुसले आहेत; त्यांचा धर्म त्यांना जितका प्रिय आहे तितकाच आपला धर्म आपणांलाही प्रिय असला पाहिजे; ते जसे, ‘ईश्वराचे आपण लाडके भक्त असें मानितात; तसेच आपण मराठे लोकही ईश्वराचीं लाडकीं लेंकरेंच आहोंत; असें समजण्यास काय हरकत आहे? 

    ईश्वर न्यायी आहे; तो सर्वांवर सारखी दया करणारा आहे. त्याच्यापुढें हा मराठा, हा मुसलमान; पहिला नावडता, दुसरा आवडता असला भेद नाहीं. मात्र जो जसें कर्तव्य बजावील, जो जसा आपल्या धर्मास, आपल्या जन्मभूमीस, आपल्या देशबांधवांस ऐक्यानें भजेल, तसा तो, त्याची जन्मभू, त्याचे देशबांधव परस्परांस सुखप्रद होतील, व त्या सर्वांची एकतानता होऊन सर्वांचा सारखाच उद्धार होईल. त्यांच्यांतील परस्परमत्सरामुळें त्या सर्वांची झालेली, होत असलेली व पुढें होणारीही दैना दूर होईल आणि जगांतील इतर लोकांस व सदुदाहरण घालून देऊन वैभवाच्या शिखरावर सुखनिद्रा घेऊं शकतील. अजा प्रकारच्या सात्त्विक श्रद्धेनें, दैवी संपत्तीच्या लालसेनें, स्वदेश, स्वधर्म आणि सदाचार यांची उन्नति करणें, हेंच कर्तव्य समजून, सतत कायावाचामनें प्रयत्न करणारे महाराष्ट्रांतील आचांडाळब्राह्मण जातींतील सर्व सत्पुरुष कसे वागले आणि त्यांना व त्यांच्या स्वदेश, स्वधर्म आणि स्वजन या प्राणप्रिय त्रयीला परम श्रेयस्कर अशी उन्नति कशी प्राप्त झाली, हें दाखविण्याचा ह्या लेखाचा उद्देश आहे. म्हणजे श्रीमुकुंदज्ञानेश्वरांच्या परमामृत, अमृतानुभवानंतर दैवानें उलट खाल्यामुळे ‘न हिन्दुर्न यवनः’ असला प्रकार झाल्यावर श्रीसमर्थ रामदासांच्या दासबोधाची आवश्यकता कशी आली आणि तो बोध सार्थनाम कसा झाला हें दाखवावयाचें आहे.  

    वरील उद्देश तडीस नेण्यास अवइ्य असणारी विद्ठत्ता लेखकाला नाहीं; तथापि ‘प्रयत्नीं परमेश्वर’ ह्या वृद्धवचनावर भरंवसा ठेवून तो चालणार आहे. श्रीज्ञानेश्वरमुकुंदराजप्रभृति साधुसंतांच्या लेखांचा, तसाच बखरी, कागदपत्रें आणि राजवाडेप्रभृती स्वेतिहासशोधकांनीं उघडकीस आणलेल्या विविध माहितीचा शक्‍य तितका उपयोग करून हा लेख सजविण्याचा विचार आहे.  

    ह्यांत तेरावें चौदावें आणि पंधरावें ह्या तीन संबंध झ्तकांचा महाराष्ट्राचा धार्मिक, सामाजिक आणि राजकीय असा तिन्ही बाजूंचा संक्षिप्त इतिहास येणार आहे. तरी वाचकांनीं सावधान राहून ग्राह्य घ्यावें, त्याज्य टाकावें आणि अक्षम्य चुका असतील त्या पदरांत घालून त्या सुधारण्याचा मार्ग त्याला दाखवावा आणि परस्परांची समजूत पटवून ऐक्य साधण्याचा संकल्प करावा, एवढी विनंति करून स्वीकृत कार्यास आरंभ करितों. 

    Digital Book – PDF

    Original price was: ₹50.00.Current price is: ₹0.00.
    Add to cart
  • -100% v

    मुंबईचा वृत्तांत

    0

    प्रस्तुत ग्रंथ : मुंबईचा वृत्तांत (या १८८९ साली प्रसिध्द झालेल्या पुस्तकाचे विस्तृत प्रस्तावनेसह यथामूल पुनमृद्रण)

    मुंबईविषयीचे दुसरे पुस्तक म्हणजे मुंबईचा वृत्तांत. हे ‘प्राचीन आणि अर्वाचीन वर्णनात्मक नकाशासह’ बाळकृष्ण बापू आचार्य व मोरो विनायक शिंगणे यांनी लिहिले आणि निर्णयसागर छापखान्यात छापून १८८९ मध्ये प्रसिद्ध केले. आपल्यापुढील कार्याचा त्यांना योग्य अंदाज होता.

    ज्या देशाचा  किंवा प्रान्ताचा इतिहास लिहावयाचा, त्याची पूर्ण माहिती ग्रंथकारास असली पाहिजे; तेथींल अनेक वयोवृद्ध व अनुभवशीर अशा गृहस्थांचा त्याच्याशीं परिचय असला पाहिजे, व त्याने त्या कामी साधनीभूत अशा अनेक ग्रंथाचे अवलोकन केलें पाहिजे. इत्यादी साधनांपैकी आम्हापाशी एकही पुरें साधन नसतां आम्ही हें धाडसाचे आणि त्यांत मुंबईसारख्या वैभवशाली शहराचा वृत्तांत लिहिण्याचे काम हातीं कां घेतलें असा प्रश्‍न साहजिक उत्पन्न होईल. होय. प्रश्‍न अगदीं बरोबर आहे. आह्मींही पूर्ण जाणत आहों की, हें काम आमच्या शक्‍तीपलिकडे आहे हें खचीत. तरी पण, यथाशक्ती प्रयत्न करून जी अल्पस्वल्प माहिती मिळविली ती तशीच दाबून न ठेवितां लोकांपुढे आणावी, बरीवाईट कशी काय असेल तशी त्यांचे ते पाहून घेतील; आणि आमचे दोष आम्हांस दाखवितील.

    असे लेखकद्वयीने प्रस्तावनेतच लिहून ठेवले आहे. ज्या पुस्तकांची त्यांनी मदत घेतली त्यात म्याक्लिन्‌स गाईड टु बॉम्बे, बुक ऑफ बॉम्बे, मुंबईचे वर्णन, राऊंड अबाऊट बॉम्बे; मुंबईनो बहार (भाग १ला), बिंबाख्यान इत्यादींचा समावेश आहे.

    नोंद: ‘मुंबईचे वर्णन’ हे कै. माडगावकराचे पुस्तक मुंबई शहरातील मराठीतील पहिले पुस्तक होय.

    मुंबईचा वृत्तांत या १८८९ साली प्रसिध्द झालेल्या पुस्तकाचे विस्तृत प्रस्तावनेसह यथामूल पुनमुुद्रण

    Digital Book -PDF

    बाळकृष्ण बापू आचार्य,   मोरो विनायक शिंगणे

    Original price was: ₹350.00.Current price is: ₹0.00.
    Add to cart