गोपाळ नीलकंठ दांडेकर (गोनीदा)
गोपाळ नीलकंठ दांडेकर हे एक अनुभवसंपन्न, सृजनशील, रसिक वृत्तीचे कलावंत आणि लेखकही होते. .तसेच गो.नी.दा. हे परिभ्रामक, कुशल छायाचित्रकार आणि दुर्गप्रेमीसुद्धा होते.
परीचितांमध्ये अप्पासाहेब आणि रसिक वाचकांचे गोनीदा, आपल्या बहुढंगी अयुष्याचे वेगवेगळे पदर अपल्या कथा- कादंबर्यांमधुन मांडणारे म्हणुन सुपरिचीत; इतिहास अभ्यासक, चळवळे कार्यकर्ते, अध्यात्मिक संशोधक, भटके निसर्ग प्रेमी अशा कित्येक गोष्टी-छंदांमुळे समृद्ध जीवन जगलेले आणि तेच वाचकांपुढे ससाळ आणि सुंदर शैलीत मांडणारे ग़ोनिदा वाचकांना नेहमीच भुरळ घालतात.