Timb (टिंब)

गोपाळ नीलकंठ दांडेकर (गोनीदा)

गोपाळ नीलकंठ दांडेकर हे एक अनुभवसंपन्न, सृजनशील, रसिक वृत्तीचे कलावंत आणि लेखकही होते. .तसेच गो.नी.दा. हे परिभ्रामक, कुशल छायाचित्रकार आणि दुर्गप्रेमीसुद्धा होते.

परीचितांमध्ये अप्पासाहेब आणि रसिक वाचकांचे गोनीदा, आपल्या बहुढंगी अयुष्याचे वेगवेगळे पदर अपल्या कथा- कादंबर्‍यांमधुन मांडणारे म्हणुन सुपरिचीत; इतिहास अभ्यासक, चळवळे कार्यकर्ते, अध्यात्मिक संशोधक, भटके निसर्ग प्रेमी अशा कित्येक गोष्टी-छंदांमुळे समृद्ध जीवन जगलेले आणि तेच वाचकांपुढे ससाळ आणि सुंदर शैलीत मांडणारे ग़ोनिदा वाचकांना नेहमीच भुरळ घालतात.

व्यंकटेश दिगंबर माडगूळकर

औपचारिक शिक्षण फारसे-मॅट्रिक-पर्यंतही-झाले नाही. तथापि स्वप्रयत्नाने वाङ्‌मयाचा व्यासंग केला.माणदेशी माणसे (१९४९) हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला, त्यातील व्यक्तिरेखांतून त्यांनी ग्रामीण माणसाचे जे अस्सल आणि जिवंत दर्शन घडविले, ते तोवरच्या मराठी साहित्याला अनोखे होते. अद्‌भुतता, स्वप्नरंजन, कल्पनारम्यता ह्यांच्या पकडीतून सुटलेल्या वास्तववादी ग्रामीण साहित्यकृतींचा आरंभ त्यांच्या ह्या कथासंग्रहापासून झाला. 

ग्रामीण कथेप्रमाणेच ग्रामीण कादंबरीच्या संदर्भातही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. बनगरवाडी (१९५५), वावटळ (१९६४), पुढचं पाऊल (१९५०), कोवळ दिवस (१९७९), करुणाष्टक (१९८२) आणि सत्तांतर (१९८२) ह्या त्यांच्या कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत. 

रानोमाळ स्वच्छंद भ्रमंती करणारे निसर्गप्रेमी, शिकारी तसेच चित्रकार म्हणूनही त्यांची ख्याती आहे. चित्रकलेचे कसलेही औपचारिक शिक्षण नसताना त्यांनी ही कला प्राप्त केली जागतिक कीर्तीच्या चित्रकारांच्या चित्रशैलीचा रसिकतेने शोध घेतला. त्यांची अनेक सुंदर रेखाटने प्रसिद्ध झालेली आहेत. आकाशवाणीवर ते दीर्घकाळ (१९५५–८५) नोकरीत होते.

[email protected]

श्री.ना. पेंडसे – श्रीपाद नारायण पेंडसे

आपल्या कथा कादंबऱ्यांतून कोकणातील विश्व आणि लोकजीवन चितारणाऱ्या श्री.नां. नी नंतर महानगरीय अनुभवही तितक्याच ताकदीने आपल्या कादंबऱ्यांतून व्यक्त केले. श्री.नां. यांच्या कादंबरीने एक नवी वाट चोखाळली. मराठीत  कादंबरीची नवी शाखा, नवी प्रकृती त्यांच्या कादंबऱ्यांपासून रूढ झाली.

[email protected]

एस. एल. भैरप्पा

अर्धशतकाहून अधिक काळ तेवीस कादंबर्‍या आणि आश्चर्यकारकपणे प्रामाणिक आत्मचरित्र लिहीणारा साहित्यिक,  भारतातील सर्वाधिक अनुवादित कादंबरीकार म्हणून,  साहित्य, सौंदर्यशास्त्र, तत्वज्ञान आणि संगीत यांचा अप्रतिम संगम काल्पनिक कथानकात  करणारा अभ्यासू म्हणून; अनंत प्रकारे करता येऊ शकते. 

या सम हा : श्रीकृष्णाचं वैचारिक चरित्र

या सम हा : श्रीकृष्णाचं वैचारिक चरित्र – डॉ. सदानंद मोरे

पाने :  300 मुल्य (₹): 350.0

कृष्णाकडे ईश्वरी अवतार म्हणून पाहण्याऐवजी इहलोकातील मानव म्हणून पाहून त्याने चरित्र लिहिणे पसंत करण्याचे कारण सरळ आहे. अवताराचे म्हणजे वैकुंठादि लोकातून इहलोकात अवतरलेल्या ईश्वराचे, त्याच्या कृतीचे अनुकरण करणे मनुष्याच्या शक्तीबाहेर आहे असे समजून त्याला देव्हाऱ्यात ठेवून किंवा त्याची मंदिरात प्रतिष्ठापना करून त्याची पूजाअर्चा करण्यातच धन्यता मानली जाते. याउलट ‘तो तुमच्या-आमच्यासारखा मनुष्य असून, स्वप्रयत्नाच्या बळावर त्याने परमेश्वरासारखा आदरभाव संपादन केला, अशी भूमिका घेतली’ तर त्याने केलेल्या कृती मानवी क्षमतेच्या कक्षेत येऊन त्यांचे अनुकरण करणे शक्य होते. हा दैवी अवतरण (खाली येणे) आणि मानवी आरोहण यांच्यातील फरक आहे. कृष्णचरित्राची ही दोन प्रारूपे आपल्यापुढे आहेत. पहिल्या प्रारुपात तो भज्य, पूज्य, वंद्य ठरतो; तर दुसऱ्यात तो अनुकरणीय आदर्श बनतो. –महेश नाईक

EMF Shielding अर्थातच कवच कुंडले

अनधिकृत, अगदी अधिकृत मोबाईल टॉवर एक समस्या आहे. मोबाईल टॉवर ची रेडिओ frequency पॉवर (तरंग शक्ती) ची अधिकृत मर्यादा इतकी जास्त आहे जणू वाहनवेगाची कमाल मर्यादा ताशी १००० किलोमीटर ठेवणं! टॉवर च्या लगतच्या परिसरात राहण्याऱ्या सर्वसामान्यांना मात्र ह्याचा दुष्परिणाम सहन करत करतच जगावे लागते, परिणामी अनेकदा ह्यातून उद्भवणाऱ्या दुर्धर आजारांना तोंड देता देता मनुष्य हतबल होऊन जातो. अश्या वेळी लढा देतांना आपण आपल्यासाठी कवचकुंडले बनविणे हे जास्तीत जास्त श्रेयस्कर असते, हा मुद्दा लक्षात घेऊन खालील माहिती संकलित केलेली आहे…. एकूणच माहितीचे संकलन हे प्रसार प्रचार ह्यासाठी केलेलं आहे.

एम टी आयवा मारू

“एम टी आयवा मारू” विषयी काही – मकरंद जोशी

मोकाट सागरावरून ओसाड किनाऱ्यावर भणभणत येणा:या समुद्रवाऱ्याप्रमाणे मराठी साहित्यविश्वात ‘एम. टी.आयवा मारू’चं आगमन झालं ते वर्ष होतं 1989. मराठी साहित्यासाठी त्या कादंबरीचं नाव जेवढं अनवट होतं, तेवढीच त्या कादंबरीची बिनठशाची भाषा, बिनधास्त निवेदन आणि पूर्णपणे अनोळखी अनुभवविश्व. पंचवीस वर्षापूर्वी ते सगळंच एवढं धक्कादायक होतं की, असंख्य बिनधास्त रसिकांनी ती कादंबरी अक्षरश: डोक्यावर घेतली. ‘एम.टी.आयवा मारू’वर कौतुकाची-पुरस्कारांची उधळण केली. दशकातल्या उत्कृष्ट कादंबऱ्यांत तिची निवड झाली.

Unveiling the Ultimate Book Lover’s Haven: Timb.in Online Multivendor Marketplace

Have you ever dreamt of a place where every bookish desire is fulfilled, where bookshelves stretch as far as the eye can see, and where a simple search opens doors to countless literary treasures? Well, welcome to the enchanting world of Timb.in! Here, we’re diving into a virtual universe where the aroma of well-worn pages mingles with the thrill of discovery. Whether you’re a book collector, an occasional reader, or a self-proclaimed bibliophile, this is your paradise.

पुस्तकांचं Online गाव: पुस्तकांसाठी Online multivendor Marketplace

पुस्तकांचं असेही एक गाव  असावं की, जिथे नजर जाईल तिथपर्यंत पुस्तकंच पुस्तकं आणि अगणित साहित्यीक खजिना सापडेल? आम्ही असेच एक Online नगर वसवीत आहोत पुस्तकांसाठी Online multivendor
Marketplace”
च्या मंत्रमुग्ध करणाऱ्या जगात स्वागत आहे!

येथे, आपण पुस्तकांच्या अथांग सागरात, साहित्य विश्वात विश्वासाने डुबकी घ्यावी, इथे कणाकणात साहित्य सुगंध
आढळेल
. आपण पुस्तक संग्राहक असाल, हौशी वाचक असाल किंवा लेखक असाल, हे आपलंच स्वप्न आहे जे सत्यात उतरले आहे.

पुस्तके का वाचावी?

लिखित शब्द संचिताचे सार –  पुस्तके

पुस्तके वाचणे ही एक अमुल्य आणि समृद्ध  करणारी गोष्ट आहे जी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे.

काळ कितीही बदलला तरीही ‘वाचन’ हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे..

मग ते पोथी असो,पुस्तक असो वृत्तपत्र असो की मासिक असो..

विद्वत्त्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन । स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते ॥

ज्ञानी माणसाचा सर्वत्र उदो उदो होतो आणि ज्ञान मिळवायचं असेल तर वाचन, मनन, चिंतन हवंच.

Shopping cart close